Author Topic: स्व:भावालाही चेहरा असतो  (Read 1449 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
स्व:भावालाही चेहरा असतो
--------------------------------
स्व:भावालाही रंग असतो
एक गंध असतो
हे तुझ्या सहवासात आल्यावर कळलं

स्व:भावालाही चेहरा असतो
एक गोडवा असतो
हे तू भेटल्यावर कळलं

स्व:भावातही असते मादक नशा
गुंतवणारी अदा
हे तुझ्यामुळेच कळलं

स्व:भावही कुणाची ओळख असू शकतो
कुणालाही प्रेमात पडू शकतो
हे तुझ्या स्व:भावामुळे कळलं

स्व:भावातही इतकी ताकद असते
की जीव जडतो त्याच्यावर
हे तुझ्या स्व:भावाचा गुलाम झाल्यावर
अन त्याच्या प्रेमात पडल्यावर कळलं .

संजय एम निकुंभ , वसई
दि . ८ . ६ . १३ वेळ : ६ . ४५ संध्या .