Author Topic: तू फक्त मिठीत घे ...........  (Read 2537 times)

तू फक्त मिठीत घे ...........
« on: July 17, 2013, 03:53:15 PM »
जेव्हा  एकट वाटतं   मला
डोळे भरून येतात आठवून तुला
तेव्हा  खरेच  गरज असते तुझी
डोळ्यांत माझ्या आसवे पुसून
तू फक्त मिठीत  घे ......
विचार खूप येतात मनाला माझ्या
वेडंच आहे  मन माझे
जे तुझ्याच  जवळ राहावे वाटतं
मग तुला ओरडते किती मी
भांडण  हि करते ....


तू समजून घेत जा ना राजा
मी तुझ्यावर किती रे प्रेम करते
मला गप्प करायला मग
तू ओठांवर ओठ टेकवून
ते सुख अनुभवायला
मला तू  फक्त  मिठीत घे  ....

गळ्यात हात टाकून मला तू
माझे केस  तू मोकळे कर
तुझ्या  जवळ  घेऊन मग म्हण
इथेच  तुझे मन मोकळे कर ....

एवढी  इच्छा माझी आता   तू पूर्ण कर
माझी अखेरची  वेळ आली  तरी
माझे डोळे बंद पाहून आसवे गाळतांना  तू  फक्त मिठीत घे .......

तू फक्त मिठीत घे ...........
तू फक्त मिठीत घे ...........
-
• ©प्रशांत शिंदे•

१७ -०७- २०१३


« Last Edit: July 17, 2013, 03:56:01 PM by प्रशांत दादाराव शिंदे »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: तू फक्त मिठीत घे ...........
« Reply #1 on: July 17, 2013, 04:38:56 PM »
kya baat.... :)

Re: तू फक्त मिठीत घे ...........
« Reply #2 on: July 17, 2013, 04:43:17 PM »
Nice one dear .......
sagar dhanyvad