Author Topic: प्रेमाचं वारं  (Read 1808 times)

Offline yogeshingale

 • Newbie
 • *
 • Posts: 23
प्रेमाचं वारं
« on: July 18, 2013, 10:31:22 AM »
प्रेमाचं वारं

तुझं आणि माझं कधी जमलंच नव्हत .
कारण ..... प्रेमाच वारं तुझ्याकडून माझ्याकडे कधी फ़िरलच नव्हत .

मी किनारा होतो , तू पाणी होतीस
पण प्रेमाच्या सागराला मात्र ओहोटीच होती ……
म्हणूनच प्रेमाची लाट ह्या किनाऱ्याला कधी येउन मिळालीच नव्हती .

तू पावसाची रिमझिम होतीस , मी वाट पाहणारा चातक …
पण ..... प्रेमाचा मात्र दुष्काळ होता
म्हणूनच तुझ्या पावसाची सर माझ्या चोची पर्यंत कधीच पोहचली नव्हती .

तू सुसाट मात्र डौलान धावणारी Express होतीस
मी तुझ्या वाटेत येणार छोटस  Station होतो
पण …… चुकुनही प्रेमाचा Signal मात्र तिथे कधी लागलाच नव्हता
म्हणून तू तिथे कधी थांबलीच नव्हतीस.

मी बसुरीतली पोकळी होतो ,तू त्यातून जाणारी फुंकर होतीस
पण … प्रेमाची फुंकर त्यातून मात्र कधी गेलीच नव्हती
म्हणूनच तुझ्या आणि माझ्या प्रेमाची मैफिल कधी जमलीच नव्हती
.
                                                    ----------------योगेश इंगळे
« Last Edit: July 18, 2013, 10:31:42 AM by yogeshingale »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: प्रेमाचं वारं
« Reply #1 on: July 18, 2013, 11:22:30 AM »
मी बसुरीतली पोकळी होतो ,तू त्यातून जाणारी फुंकर होतीस ....

kya baat.....
nice... :)

Offline vinod.shirodkar111

 • Newbie
 • *
 • Posts: 44
 • Gender: Male
 • तुझ्यासाठी कवी बनलो …:)
Re: प्रेमाचं वारं
« Reply #2 on: July 18, 2013, 07:02:08 PM »
wah........!!!!!!!!!!!!!

Offline yogeshingale

 • Newbie
 • *
 • Posts: 23
Re: प्रेमाचं वारं
« Reply #3 on: July 19, 2013, 04:34:42 PM »
Thanks