Author Topic: माझ्या मनाचं पाखरू  (Read 1539 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
माझ्या मनाचं पाखरू
« on: July 18, 2013, 07:01:57 PM »
माझ्या मनाचं पाखरू
================
तुझं रूप डोळ्यासमोर
फेर धरून नाचतांना
तुझे डोळ्यांचे इशारे
माझं चित्त चोरतांना
सांग प्रिये कसं मी
कुठलही काम करू ……

माझं मन तर तुझ्याशिवाय
कुठलाही विचार करत नाही
तुझ्याशिवाय माझं मन
कशातही रमत नाही
तूच सांग प्रिये
माझ्या मनास कसा आवरू …….

तू अशी वागलीस तर
माझं कसं होईल
माझा वेडेपणा पाहून
जगात हसू होईलं
वेशीवर टांगेल गं
माझ्या प्रेमाची आबरू ……

फक्त स्वप्नात येऊन छळलीस तरी चालेलं
रात्र जागवलीस तरी हरकत नसेल
एवढं माझ्या प्रेमासाठी कर नां प्रिये
तूच आहे माझ्या मनाचं पाखरू .
------------------------------------------
संजय एम निकुंभ , वसई
दि. ५. ७.१३

Marathi Kavita : मराठी कविता