Copyrights Reserved....
कविता संग्रह - प्रेम कल्पिता मानसी
लेखक - हितेश राणे myself...
कविता - प्रेमाची आठवण .....
तुला थोडा उशीर झाला की
वाट पहावी लागायची
तुझ्या Tommyला पाहिल्यावर
वाट माझी लागायची
माझी हाक काही नाही
Tommyची हाक ऐकू यायची
त्याला तू तिथे कुरवाळायची
आणि इथे माझी जळायची
मग एकाच छात्रित पावसात
आपण भिजत शाळेत जायचो
कोणाला मी दिसू नए म्हणुन
मी माझेच डोळे झाकायाचो
कुठेही सोबत जाताना
शाळेत एकत्र असताना
एकमेकांची सवय झाली होती
तुझ्या माझ्या हातांना
जरा कुठे गेलीस की
तुला शोधत फिरयाचो
जरा कुठे दिसलीस की
जोर जोराने नाचायाचो
तुला वर्गाबाहेर काढल्यावर
खुप खोड्या करायचो
बाईंनी "Get Out" म्हणताच
"हेच हव होतं" म्हणायचो
P.T. च्या तासाला आपण
भलतीकडेच भटकायाचो
मुलगी म्हणुन तू सुटायचीस ग
मीच नेहमी लटकायचो
तुला भूक कधी लागली तर
माझा डबा तुला द्यायचो
डकार तू द्यायाचिस ग
मी तर उपाशी मरायचो
तू शिवी जरी दिली तरी
फुल म्हणुन झेलायाचो
रडू आलं कधी मला तरी
तुझ्यासाठी हसायचो
खरं विमान तर स्वप्नच राहिलं
कागदाची विमानं खुप पाठवली
प्रेमाची नाव काळाच्या ओघात
केव्हाच वाहून गेली
प्रेमातल्या आठवणी
विसरु नकोस कधी
आटू नको देउस
डोळ्यातलं पाणी
माझी आठवण आल्यावर रडशील
म्हणुन मी तुझ्यासमोर येत नाही
चुकुनही विचार करू नकोस की
मी तुझ्यावर प्रेम करत नाही
तुझ्या माझ्या प्रेमाचा
बाघ कसा शेवट झाला
पाहिलेल्या picture पैकी
एकही कामात नाही आला ..... एकही कामात नाही आला ....