Author Topic: तुझ्याविना जगताना.....  (Read 2844 times)

तुझ्याविना जगताना.....
« on: July 24, 2013, 04:43:04 PM »
तुझ्याविना जगताना
 मी तुझीच होऊन गेले
 हातात हात असताना
 हात कधीच  मागे सुटून गेले....
 
 तुझ्यावर  प्रेम करत गेले मी
 अन....
 तुला ते सांगताना शब्दच  सारे हरवून गेले ....
 
 तुझ्या प्रीतीच्या खेळात
 मी  सख्या नेहमीच डाव हरत गेले
 तुझी होता होता आज  माझेही मी न  राहून गेले .......
 
 तुझ्याविना जगताना
 मी तुझीच रे होऊन गेले ..........
  -
 • ©प्रशांत शिंदे•
« Last Edit: August 07, 2013, 04:15:12 PM by प्रशांत दादाराव शिंदे »

Marathi Kavita : मराठी कविता