Author Topic: एवढसं मिळू दे तिला .....  (Read 1620 times)

Offline vinod.patil.12177276

  • Newbie
  • *
  • Posts: 45
एवढसं मिळू दे तिला .....
« on: July 26, 2013, 07:26:04 PM »


एवढसं मिळू दे तीला .....


हसणं लोळु दे ओठांवरती
पाणी शिंपू दे गालांवरती
आनंदाच्या कारंज्यातुनी
स्पंदन उमटू दे ह्र्दयावरती

हर्ष डोलु दे मनावरती
स्वर्ग भाळू दे स्वप्नांवरती
मधूर सुरांच्या कंठामधुनी
गीत बहरु दे जिवनावरती

सरी बरसू दे सर्र्यानवरती
धन्य होऊ दे सुखांवरती
रोमांच्या उधानातुनी
आभाळ फूलू दे ता-यांवरती

रंग उधळू दे स्रूष्टीवरती
बंध जुळू दे पाखरांवरती
शब्द फुलांच्या गंधामधुनी
स्पर्श करू दे भावनांवरती

गर्व नसू दे रूपड्यावरती
कर्म असु दे रंजल्यांवरती
निष्पाप तीच्या मनामधुनी
प्रेम घडू दे जगतावरती

   -विनोद पाटील

Marathi Kavita : मराठी कविता