Author Topic: हासता मी  (Read 978 times)

Offline swatium

  • Newbie
  • *
  • Posts: 34
हासता मी
« on: July 28, 2013, 10:03:27 AM »
हासता मी

वितळले घाव अंतरीचे

फुलून आले भाव मनीचे

हासता  मी

ओसरले वाळवंट  भोवतालचे

फुलून आले चांदणं डोळ्यातले

हासता मी

दुरातले स्वप्नं विसावले

फुलून आले हृदयात सख्या रे

हासता  मी

बदलले विश्व सारे

फुलून आले नाते अमृतात भिजलेले

…………………………

चिरंजीव तुझेमाझे !

…………. स्वाती मेहेंदळे   

Marathi Kavita : मराठी कविता