Author Topic: दोन क्षण तरी आपुलकीने, सोबत देत जा तु.....  (Read 1234 times)

ही खास कविता फक्त तिच्यासाठी...!!

असं नको गं छळत जावूस मला,
कधीतरी प्रेमाने जवळ येऊन,
घट्ट मिठीत घेत जा तु.....

कळत नाही का माझ्या भावना तुला,
कधीतरी न सांगता,
अलगद कुशीत शिरत जा तु.....

दुरावा हा,
सहनही होत नाही,
आणि सांगताही येत नाही.....

नकळतपणे ओठांवर,
ओठ टेकवून मला,
बेभान करत जा तु.....

एकटेपणा खुप सतवतो गं मला,
दोन क्षण तरी आपुलकीने,
सोबत देत जा तु.....

दोन क्षण तरी आपुलकीने,
सोबत देत जा तु.....

~I Love You Shona...

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
Sureshji khup sundar...
... Don kshan tari apulkine sobat det ja tu..
Kya baat ...