Author Topic: मला ही वाटत कोणीतरी आपलं असावं.....  (Read 1579 times)

पाहतचं तिला ह्रदय धकधक धडकावं,
तिच्या एकाचं नजरेत घायाळ व्हावं,
मला ही वाटत कोणीतरी आपलं असावं.....

तिच्या सुखासाठी मी स्वःताचं दुःख विसरावं,
तिला पाहताचं नजरेनं माझ्या थांबावं,
मला ही वाटत कोणीतरी आपलं असावं.....

तिचे अश्रूं पाहता मी त्याने तळहातावर झेलावं,
आणि तिने रडताना घट्ट मिठीत कवटाळावं,
मला ही वाटत कोणीतरी आपलं असावं.....

मी फक्त तिचाचं आहे हे तिला न सांगता कळावं,
आणि मिठीत असताना तिने जग सारं विसरावं,
मला ही वाटत कोणीतरी आपलं असावं.....

घरी खोटे सांगून मला भेटायला यावं,
आणि तिने भेटताचं डोळ्यांनी इशारे करुन,
i love u म्हणावं,
मला ही वाटत कोणीतरी आपलं असावं.....

माझ्याशी तिने नेहमी खोटं खोटं भांडावं,
आणि भांडून झाल्यावर प्रेमाने Sorry बोलावं,
खरचं यार,
मला ही वाटत कोणीतरी आपलं असावं.....

मला ही वाटत कोणीतरी आपलं असावं.....

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Satvik

  • Guest
तिचे अश्रूं पाहता मी त्याने तळहातावर झेलावं,
आणि तिने रडताना घट्ट मिठीत कवटाळावं,
मला ही वाटत कोणीतरी आपलं असावं.....

Surekh