Author Topic: आयुष्यात एकदा तरी प्रेम करावं.....  (Read 1543 times)

पाहताचं तीला नजरेत माझ्या,
तिचं प्रतिबिँब उमटावं,
तिने लाजेने लालबुंद होवून,
एक गोड स्मित हास्य द्यावं.....

तिच्याशी प्रेमानी बोलताना,
तिच्या नजरेने हळूचं लाजावं,
मी फक्त तिचाचं आहे,
हे तिला माझ्या नजरेत दिसावं.....

आयुष्यात एकदा तरी प्रेम करावं...!!

किती प्रेम आहे माझे,
हे तिला न सांगता जाणवावं,
माझ्या डोळ्यातील अश्रूंनां तिने,
तिच्या नाजुक ओठांनी टिपावं.....

मला तिने आयुष्यभरासाठी,
देवाकडे प्रार्थनेत मागावं,
मला चोरुन चोरुन भेटण्यासाठी,
तिने घरी खोटं कारण सागावं.....

आयुष्यात एकदा तरी प्रेम करावं...!!

भेटायला आल्यावर तिने,
मला घट्ट मिठीत कवटाळावं,
मी जरी नसलो या जगात,
तिच्या मनात मी उरावं.....

आयुष्यात एकदा तरी प्रेम करावं...!!

खरचं यार,
आयुष्यात एकदा तरी प्रेम करावं.....
आयुष्यात एकदा तरी प्रेम करावं.....

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....