Author Topic: आता दोघांनाही लग्नाची ओढ लागली होती.....  (Read 1117 times)

आज तिची नि माझी भेट पहीली,
काही तोकड्या क्षणानांचीच होती,
माझी नजर फक्त तिच्यावर,
आणि तिची नजर माझ्यावर होती...

मी घरी जायाला निघालो,
तशी ती नकळत पुढे आली,
स्मित हास्य देऊन डोळ्यात पाणी आणुन,
आपण परत भेटू रे म्हणाली.....

आणि खरच आम्ही परत ऐकदा,
आतुरतेने एकमेकांना भेटलो,
हे भेटणे आमचे आज,
जरा जगा वेगळेच होते.....

भरुन आले भावनांनचे आभाळ,
ईथे फक्त ती आणि मी होतो,
तिच्याशी खुपकाही बोलायच होतं मला,
पण ओठांतून शब्दही फुटत नव्हती.....

आज ती पुन्हा निघाली,
मी श्वास रोखुन म्हणालो,
" तु मला खुप आवडतेस,
फक्त एवढे मी बोललो होतो.....

ती क्षणात बघता बघता दिसेनाशी झाली,
तिचे उत्तर गुलदस्त्याच ठेवून गेली,
मी माघारी फिरलो तर,
ती माझ्या समोरच उभी होती.....

काही समजण्याच्या आधीच तिने मला,
तिच्या घट्ट मिठीत कवटाळल होतं,
तिच्या उबदार मिठीत विसावताच,
मला तिचं उत्तर कळलं होतं.....

मनामध्ये उठलेलं एक वादळ,
तिच्या उत्तराने थांबल होतं,
आज ती फक्त आणि फक्त माझी,
आणि मी कायमचा तिचाच झालो होतो.....

असे काही गुंतलो ती आणि मी,
एकमेकाच्या सहवासात की,
आता दोघांनाही लग्नाची ओढ लागली होती.....

आता दोघांनाही लग्नाची ओढ लागली होती.....

अजुन पुढे काय ???

ते लग्न झाल्यानंतर कळेल.....

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....