Author Topic: माझ्या स्वप्नात का येते ती.....  (Read 1338 times)

मी तिचा कोणी लागत नसताना,
मला का असे सतवते ती,
कधी गोड गोड हसते,
तर कधी अचानक रुसते ती.....

काय तरी करु मी तीच,
खरच काही मला कळत नाही,
कधी नकळत हसवते मला,
तर कधी खुप खुप रडवते ती.....

कधी अचानक कडकडून भांडते,
कधी नाक फुगवून रुसते,
खरच तीच प्रेम आहे का माझ्यावर,
की भावनांनशी माझ्या खेळतेय ती.....

मला ही आता करमत नाही,
एक क्षणही राहवत नाही तिच्याशिवाय,
प्रत्येक क्षणी प्रत्येक्ष वेळी,
जवळपास माझ्या भासते ती.....

कशा कळतील कशा समजतील,
माझ्या बद्दलच्या भावना तिच्या,
समोर असताना ती काहीच बोलत नाही,
डोळ्यांनी मात्र सर्वकाही बोलते ती.....

हरवून बसलो रात्रीची झोप मी,
हसवला मनाचा चैन माझ्या,
श्वासही माझे गुलाम झालेत तिचे,
ह्रदय स्पंदन बनुन धडकतेय ती.....

हे खरच प्रेम आहे की,
आहे मुर्खपणा वेडेपणा माझा,
काही समजतच नाही मला,
माझ्या स्वप्नात का येते ती.....

माझ्या स्वप्नात का येते ती.....

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक १६-०८-२०१३...
सांयकाळी ०४,३१...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Rupesh Shende

  • Guest
मला ही आता करमत नाही,
एक क्षणही राहवत नाही तिच्याशिवाय,
प्रत्येक क्षणी प्रत्येक्ष वेळी,
जवळपास माझ्या भासते ती.....

छान :)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
tuza shabda peksha tuza bhavna khup kahi sangun gelya

keep it up dude