Author Topic: पाहिजे तर तुच बाकी कुणीच नाही...  (Read 1387 times)

का असं झाले कळलेच नाही...
मी आता माझाच उरलो नाही...

जेव्हा मी तुला पहिल्यांदाच पाहिलं...
केव्हा तुझ्यावर भाळलो कळलेच नाही...

तुझ्यावर सुंदरशी कविता लिहावी म्हटलं...
तुझ्या सौंदर्या सारखेशब्द सुचलेच नाही...

मी आता मनात  ठरवूनच बसलोय...
पाहिजे तर तुच बाकी कुणीच नाही...

© कौस्तुभ

Marathi Kavita : मराठी कविता


Ratan Gawan

  • Guest