Author Topic: मी तुझ्यावर खुप प्रेम करतो.....  (Read 1484 times)

तू जवळ असल्यावर,

माझ्या जिवात जीव येतो.....

अन्...!!

तू माझ्यापासून दूरावल्यावर,

माझ्या जिवात जीवच नसतो.....

जातेस माझ्यापासून दूर तु जेव्हा,

तेव्हा मी माझा एकटाच उरतो.....

अन्...!!

तुझा हातात हात असला की,

मनाला माझ्या आधार मिळतो.....

तु हात सोडलास की,

जीव नको नकोसा वाटतो.....

काय गं शोना कळतय का तुला,

का मी असा वागतो.....

कारण ???

याचा अर्थ असा होतो की,

मी तुझ्यावर खुप प्रेम करतो.....

मी तुझ्यावर खुप प्रेम करतो.....

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)
स्वलिखित -
दिनांक १७-०८-२०१३...
दुपारी ०१,०१...
© सुरेश सोनावणे.....