Author Topic: मरणानंतर ही आपलं प्रेम अमर व्हावं.....  (Read 1654 times)

खास मुलाच्या मनातलं,
Love At 1st Side.....

देव करो नकळत असं घडावं,
तु ही माझ्या प्रेमात पडावं,
जेवढे प्रेम करतो मी तुझ्यावर,
तेवढेच प्रेम तु ही माझ्यावर करावं.....

जसा तळमळतो मी तुझ्यासाठी,
तसेच तु ही माझ्यासाठी तरसावं,
जशी वाट पाहतो मी तुझ्या येण्याची,
तसेच तु ही माझ्यासाठी बेचैन व्हावं.....

माझ्या येण्याच्या चाहूलीने,
तु ही आतुर व्हावं,
मी येताच जवळ तुझ्या,
अलगद तु माझ्या कुशीत शिरावं.....

असेकाही गुंतुया आपण ऐकमेकात,
मी फक्त तुला अन् तु फक्त मला आठवावं,
मी तुझा होता होता,
तु माझ्या नकळत मला चोरावं.....

मी तर एका क्षणातच झालो गं तुझा,
तु ही मला आपलसं करावं,
ईतकं प्रेम असावं ऐकमेकात,
मरणानंतर ही आपलं प्रेम अमर व्हावं.....

मरणानंतर ही आपलं प्रेम अमर व्हावं.....


i love shon@.....

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


मंजिरी

  • Guest

स्वप्नांचे किल्ले भल्लेमोठ्ठे
बांधतो मी रेतीत
आढ्याकडे पहाता पहाता
बसून माझ्या खोलीत