Author Topic: का वाटावे असे मनाला ?  (Read 1173 times)

Offline Mayur Jadhav

  • Jr. Member
  • **
  • Posts: 68
  • Gender: Male
  • शब्द हेच जीवनातील खरे सोबती .
का वाटावे असे मनाला ?
« on: August 19, 2013, 11:43:50 AM »
 का वाटावे असे मनाला ?

 का वाटावे असे मनाला की ,
प्रेमाच्या आनंदात उंच उंच फिरावे अन
कितीही फिरलो तरी
मन आनंदात अजून बुडावे …
का वाटावे असे मनाला की ,
प्रेमाच्या आकाशात खुप सैर करावी अन
कितीही सैर केली तरी
हे आकाश का भकास वाटावे…
का वाटावे असे मनाला की ,
प्रेमाच्या स्वप्नामध्ये आणखी स्वप्नं पहावीत अन
कितीही स्वप्नं पहिली तरी
ही स्वप्नं का तुटावीत… 
का वाटावे असे मनाला की ,
प्रेमाच्या आयुष्यात तू सदैव बरोबर असावे अन
कितीही तुझ्यासमवेत आयुष्य जगलो तरी
हे  आयुष्य का अजून एकदा हवेहवे वाटावे…
का वाटावे असे मनाला.................

मयूर जाधव,
कुडाळ (सातारा).   

Marathi Kavita : मराठी कविता