Author Topic: तिचं असण तिचं हसण  (Read 1517 times)

Offline Mangesh Kocharekar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 95
तिचं असण तिचं हसण
« on: August 19, 2013, 06:41:01 PM »


तीच असण, तीच रुसण, तीच हसण , मी सार काही समजून घेतलं
तिच्यासाठी ,प्रेमासाठी,फुलणाऱ्या कळीसाठी   मी गोड सारच मानून घेतल
तिच्या प्रेमाखातर मी माझ मैत्रेय ,नात गोत फुकून टाकल
एवढ सार सोडल्यावर तिच्या दिलाला थोड कुठ बर वाटल
     ती नाही भेटली तर मी तिला न बोलताच  समजून घ्यायचं
      मी नाही भेटू शकलो तर मात्र तीच मी निमूट ऐकून घ्यायचं
     आमच प्रेम हे अस तीच्य वळणा वळणाने सुसाट वाहायच
     मी त्या प्रेमाचा मूक साक्षीदार म्हणून निमूट हसून पहायचं
काय गंमत होती त्या प्रेमात? ,सारा  जल्मच गेला असता समजून घेण्यात
भेटीत ती बहरायची वाट्टेल ते मागायची माझा ब्यालंस संपला देण्यात
तीच्या  रूपावर मी फिदा त्यानेच केला वांदा साला प्रोब्लेम झाला तिला पाहण्यात
दिसत त्याला भुलू नका ,उगाच कुणा खुणवू नका मग वेळ जाईल सार सोसण्यात
       कुणाच काय खर कळत  नाही तोवर उडवू नका भुवई
        प्रेमाच्या हौदात पडण्याची उगाच  नका करू घाई 
        जी शांतपणे साथ देते  ती असते मंदिरातील समई
         मशालींना असते फक्त जळण्या -जाळण्याची घाई   
             
 
                                           मंगेश कोचरेकर

Marathi Kavita : मराठी कविता


sandesh bhalekar

  • Guest
तिचं असण तिचं हसण
« Reply #1 on: August 19, 2013, 08:57:03 PM »
 :) :) :) :)kup chan kavita ahe yar i like :) :) :) :) :) :)