Author Topic: तुझ्याशिवाय मला करमेना ???  (Read 1678 times)

तुझ्याशिवाय मला करमेना ???

तुझ्याशिवाय मला काही का सुचेना,
तुझ्याशिवाय मला काही का जमेना,
तुझ्याशिवाय मन कुठेच का लागेना,
तुझ्याशिवाय काहीच का करता येईना.....

कसे गं सांगू शोना मी तुला ???

खरचं तुझ्याशिवाय मला करमेना...!!

तु माझी जिवन वाहिनी आहेस,
तुझ्यामध्येच गुंतलाय जीव माझा,
तो कुठेच का वळेना,
तुझ्याशिवाय मला काहीच दिसेना.....

खरच तुझ्याशिवाय मला करमेना...!!

तु माझ्यावर जिवापाड प्रेम करत होतीस ना,
का आता तुला माझे प्रेम कळेना,
अबोल झालेल्या भावनांना आधार का देईना,
का माझ्याशी तु आता काहीच का बोले ना.....

कसं गं सांगु मी शोना तुला ???

खरच तुझ्याशिवाय मला करमेना...!!

तुला कधीच का मी विसरेना,
तुझ्यातच जीव अडकलाय ना,
ह्रदयात कोरलेले नाव तुझे पुसेना,
आता तुला ही माझ्या भावना कळेना.....

कसं गं सांगु मी शोना तुला ???

खरच तुझ्याशिवाय मला करमेना.....

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

By - Mahesh P Koli