Author Topic: सांग ना प्रिये माझ्या जीवनी कधी येतेस  (Read 1074 times)

Offline kavita.sudar15

  • Newbie
  • *
  • Posts: 28
मन थोडेसे हल्ली जरा कावरे बावरे झाले आहे,
     कुणी म्हणे वेड्या प्रेमाचे त्याला वारे लागले आहे...!
खरच का मला प्रेम झाले आहे, का मनाचे सारे खेळ आहेत,
   तिच्या चेहऱ्याची एक झलक पाहण्यास नजर व्याकूळ असते मात्र सतत...!
खरच हे प्रेम आहे कि मनाचे सारे वेडे भास,
    पण सारखे मज वाटते कि तिच्यात काहीतरी आहे खास....!
बोलू का सरळ तिला हो माझी राणी,
    कोणते साम्राज्य जरी नसले माझे,
तुझ्या प्रेमात सारे जग फक्त असेल तुझे अन माझे....!
दुरून असे पाहून हसून जातेस,
   सांग ना प्रिये माझ्या जीवनी कधी येतेस.....!!!!
       सांग ना प्रिये माझ्या जीवनी कधी येतेस.....!!!!!@ कविता @