Author Topic: वळुन का बघते...  (Read 1346 times)

Offline शापित राजकुमार

  • Newbie
  • *
  • Posts: 15
  • Gender: Male
  • शापित राजकुमार किंवा एक दीवना था
वळुन का बघते...
« on: August 22, 2013, 12:14:09 AM »


तु माझ्यावर प्रेम करत नाही
मला लाईन मारु देत नाही
तरी मी दिसलो की ,
वळुन का बघते कऴत नाही..

मला एकटयाला बघुन तु
क्युट स्माईल देतेस..
कोणी असेल तर मला
ओळखत पण नाही..
जातांना मात्र तुझी नजर
सैरावैरा मला शोधते..
पण तु वळुन का बघते कळत नाही..

मी तुझ्याशी बोलायला आलो,
की मला इग्नोर करते..
कोणी नसतांना लाईब्ररीत नेमके
माझ्या जवळचे पुस्तकच हवे असते..
दिल्यानतर ही तुझी पाऊले
पुढे सरकत नाही..
तु वळुन का बघते कळतच नाही..

मी तुझ्यावर मरतो हे
मी मान्य करतो..
तु पण माझ्या साठी झुरते,
हे तु का मानत नाही..
तु वळुन का बघते कळतच नाही..

... सिध्दार्थ पाटील™…
.. दि. १४.०७.२०१३..

Marathi Kavita : मराठी कविता