Author Topic: आठवणींत तुझ्या..  (Read 1643 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
आठवणींत तुझ्या..
« on: August 22, 2013, 03:52:59 AM »
आठवणींत तुझ्या सखये -विरुनी सूर गेले

जीवनांतील कर्णमधूर-संगीतही सरले ।

दिन एक एक जातो

स्मृतिला बहर येतो

त्या स्मृति बांधण्याला-शब्द अपुरेच पडले ।

गंध वायूचा मधून

जातो तनु गोंजारून

परि जाण मना येता-समजते ते स्वप्न पडले ।

पेंगुळलेल्या स्वप्नांमधुनी

जागविले तूं मला साजणी

नेत्रांवरील झोप उडतां -नेत्र फक्त जळजळले ।

सांग तुला मी कसे विसरू

दुःख मनींचे कसें आंवरु

जीवनांस ह्या एकाकी-मन माझे विटून गेले

आठवणींत तुझ्या सखये -विरुनी सूर गेले ।।

 रविंद्र बेंद्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/06/love-poem_10.html

Marathi Kavita : मराठी कविता