Author Topic: त्याला पाणीपुरी आवडत नाही  (Read 2066 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
कवी सौमित्र ह्यांच्या "तिला पाउस आवडतो" ह्या कवितेवरून लिहिलेली मुक्तछंद कविता.

 
त्याला पाणीपुरी आवडत नाही, तिला पाणीपुरी आवडते
दर रविवार साध्याकाळी ती, पाणीपुरीवरून त्याच्याशी भांडते
 
मी तुला आवडते मग, पाणीपुरी का आवडत नाही?
असला तुझा अरसिकपणा, मला तरी बाई आवडत नाही!
 
पाणीपुरी म्हणजे झगडा, पाणीपुरी म्हणजे “परप्रांतीय भैय्या”
पाणीपुरी म्हणजे रगडा, पाणीपुरी म्हणजे मनापासून “अय्या”
 
पाणीपुरी पोट भिगडवते गं बाई, पाणीपुरी वेळ घालवते........
पाणीपुरी मुड सुधरवते रे बाबा, पाणीपुरी मला आवडते.......
 
पाणीपुरी म्हणजे पाण्यात, हात बुचकळून ढवळा... शीईई.....
पाणीपुरी खात नाहीस, असला कसला रे तू सैयां?
 
दर आठवड्यात रविवार येतो, साध्याकाळी रुसणं होतं 
पाणीपुरीवरून मुड जातो, साध्याकाळचं त्याच्या भजं होतं
 
पाणीपुरी आवडत नसली तरी, ती त्याला फार आवडते
पाणीपुरीसकट आवडावी ती, म्हणून, तीही त्याला मनवते 
 
रुसून शेवटी एकटीच ती, तिखट पाणीपुरी घुश्यात खाते
ठसका लागताच डोळे पुसायला, त्याच्याकडेच रुमाल मागते
 
पाणीपुरीचं भांडण मग, डोळे पुसतानाच संपून जातं
तिचं लालेलाल नाक बघून, त्याचंही मन विरघळून जातं 
 

केदार…………

 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Maddy_487

  • Jr. Member
  • **
  • Posts: 145
  • Gender: Male
Re: त्याला पाणीपुरी आवडत नाही
« Reply #1 on: November 10, 2013, 12:59:03 AM »
Waa kya baat  :D