Author Topic: आयुष्य तुझ्यावर अर्पण करायचयं.....  (Read 2119 times)

खास लग्न ठरलेल्या मुलांच्या मनातलं,
मुलीँनी एकदा नक्कीचं वाचा.....

थाटूनी संसार सुखाचा,
मला तुझाचं होवून रहायचयं.....

हातात घेवूनी हात तुझा,
मला तुला मुंबईला फिरवायचयं.....

डोळ्यात बुडून अखंड तुझ्या,
माझ्या मनातल्या भावनांना मोकळं करायचयं.....

बांधुनी सातजन्माचं नातं तुझ्याशी,
माझी राणी म्हणुन मिरवायचयं.....

करुनी तुला नवरी माझी,
तुला फुलासारखं जपायचयं.....

मी फक्त तुझा आणि तुझाचं असेल,
कारण ???
तुला माझ्या आयुष्याची भागीदार करायचयं.....

तुझ्या प्रत्येक सुख-दुःखात,
मला हक्काचं स्थान मिळवायचयं.....

तु माझी कायमची झाल्यावर,
आयुष्य तुझ्यावर अर्पण करायचयं.....

आयुष्य तुझ्यावर अर्पण करायचयं.....


_____/)___/ )______./¯”"”/ ’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


deshpande Arpita

  • Guest
तुझ्या प्रत्येक सुख-दुःखात,
मला हक्काचं स्थान मिळवायचयं.....

तु माझी कायमची झाल्यावर,
आयुष्य तुझ्यावर अर्पण करायचयं.....

SUNDAR KAVITA
.....

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 518
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
एकच नंबर

RATAN AWACHAR

  • Guest
अ प्रतिम कविता

शारदा

  • Guest
हातात घेवूनी हात तुझा,
मला तुला मुंबईला फिरवायचंय....
.
.
.
.
मुंबईतल्या रस्त्यांवर तोबा गर्दी
संरक्षणाला गे नसती गारदी
ठेवीन माझ्या एका हाती मी तुझा हात
नि माझ्या ठेवीन खिश्यावर माझा दुसरा हात
एरवी पाकिट होईल गे माझे लंपास हातोहात.