Author Topic: तुझ्याशिवाय..........  (Read 2125 times)

Offline Mayur Jadhav

  • Jr. Member
  • **
  • Posts: 68
  • Gender: Male
  • शब्द हेच जीवनातील खरे सोबती .
तुझ्याशिवाय..........
« on: August 27, 2013, 01:50:11 PM »
तुझ्याशिवाय..........

नाही पटत आणि रुचतही नाही
तुझ्याशिवाय राहणंही करवत नाही ,
नाही समजत आणि उमजतही नाही
तुझ्याशिवाय दुसरं दिसणंही मनाला जमत नाही ,
नाही जुळत आणि कळतही नाही
तुझ्याशिवाय लिहणंही शब्दांना दिसत नाही ,
नाही स्वप्न आणि अभासही नाही
तुझ्याशिवाय आठवणी आठवतही नाही ,
नाही जगणं आणि मरणही नाही
तुझ्याशिवाय हा प्रवास मला करवतही नाही ,
नाही संपूर्ण आणि अपुर्नही नाही
तुझ्याशिवाय जीवनही सार्थ होत नाही ,
नाही एकटा आणि कोणाची साथही नाही
तुझ्याशिवाय तुला दिलेली वचनही पूर्ण करता येत नाही ,
नाही सांगत आणि विसरतही नाही
तुझ्याशिवाय नसताना त्रास करून घेऊ नकोस हे तुझे बोलही विसरत नाही ,
नाही आनंद आणि दु:खही नाही
तुझ्याशिवाय सुखही कधी पहिलेच नाही ,
नाही प्रकाश आणि अंधारही नाही
तुझ्याशिवाय सावलीही माझी पडत नाही ,
नाही बोलत आणि अबोलही नाही
तुझ्याशिवाय स्वरही माझे बहरत नाही ,

शेवटी तुला.... 
नाही दुसरं आणि कोणीचही  नाही
माझ्याशिवाय तुला काहीच दिसलंही  नाही ,
नाही गेलीस आणि उशीरही नाही
माझ्याशिवाय येण्याकडे तुला काहीच दुसरं  करवलही नाही  .

+918888595857 ,
मयुर जाधव ,
कुडाळ (सातारा) .

Marathi Kavita : मराठी कविता