Author Topic: भेट माझी तुझी...  (Read 1457 times)

Offline Er shailesh shael

  • Jr. Member
  • **
  • Posts: 77
  • Gender: Male
भेट माझी तुझी...
« on: August 28, 2013, 10:57:48 AM »
भेट माझी तुझी....
अशी पावसाळी होती
भिजलेली तू अन चिंब मी
ती सांज वेगळी होती .....
शहारले होते स्पर्श आपले
हात हातात राहून गेले
मोहरल्या होत्या संवेदना सा-या
शब्द ओठातले वाहून गेले....
विसावलेली वीज तुझ्या नजरेतली
थेट काळीज चिरत गेली
पापणी मिटता तुझी
वेदना काळजाची विरत गेली......
तू थांबावेस अजून जरासे म्हणून
पाउस हि वेळीच आला
आडोसा घेतलास माझा मिठीत जेव्हा
पाउसही क्षणभर हिरमुसला........
ओढ लागली मनाशी मनाची
नाते जुळले दोन जीवांचे
साथ दे तुही जराशी
वचन हे सात जन्मांचे........
-----पाउसवेडा

Marathi Kavita : मराठी कविता