Author Topic: आयुष्याचा जोडीदार मी निवडलय तुला.....  (Read 1825 times)

खास प्रेमात पडलेल्या मुलीच्या मनातलं...!!

माझ्यावर जीव ओवाळतो,
माझ्यासाठीच तु झूरतो,
तरीही का असा परख्यागत वागतो.....

माझ्यावर खुप प्रेम करतो,
तरीही माझा तिरस्कार करतो,
असे दाखवण्याचा प्रयत्न करतो.....

खुप बेचैन असतोस ना तु,
माझे बोलणे ऐकण्यासाठी,
माझा मेसेज येईल म्हणुन,
मोबाईलकडे एकटक पाहत असतो.....

अन् मेसेज केला की,
खोटं खोटं रागाने बोलतो,
माझ्यावर ओरडत असतो.....

मलाही कळतात रे तुझ्या भावना,
तुझ्या मनातले दुःख,
तुझ्या ह्रदयाला होणा-या यातना.....

पण ???

तुला समजून घ्यायला,
तुझे प्रेमळ मन जाणायला,
थोडासा वेळ हवाय रे मला.....

मी थोडी वेडीच आहे रे,
माहीत आहेच ना रे तुला,
प्लीज नको रे असे,
रागवत जावूस माझ्यावर.....

खुप प्रेम करते रे मी तुझ्यावर,
तुझ्यासाठीच धडपडते म्हणुन,
आयुष्याचा जोडीदार मी निवडलय तुला.....

आयुष्याचा जोडीदार मी निवडलय तुला.....

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक २८-०८-२०१३...
दुपारी ०४,३६...
© सुरेश सोनावणे.....