Author Topic: अशी हि कविता............  (Read 1220 times)

Offline Er shailesh shael

  • Jr. Member
  • **
  • Posts: 77
  • Gender: Male
अशी हि कविता............
« on: August 28, 2013, 07:23:54 PM »
अशी हि कविता.......
कधी फक्त शब्दांची
तर कधी त्यामधल्या भावनांची असते
कधी अर्थाची कधी व्यर्थाची
तर कधी अबोल प्रेमाची असते
अशी हि कविता .....
कधी आधार असते आठवणींचा
तर कधी सोबत असते एकांताची
कधी सांज असते आभासांची
तर कधी रात्र वेदनांची....
कधी चांदण्यांच्या गर्दीतला एकटा चंद्र असते
तर कधी चांदण्यांनी भरलेले आभाळ असते
कधी रातराणीचा हळुवार गंध
तर कधी काजव्यांची माळ असते
अशी हि कविता....
कधी झरझरणारी सर पावसाची
तर कधी रखरखीत उन्हाची असते
कधी त्या उन्हात फिरणा-या पाखरांची
तर कधी पावसात भिजणा-या मनाची असते....
अशी हि कविता....
कधी तिच्या स्पर्शाची
तर कधी तिच्या दुराव्याची असते
कधी तिच्या भेटीची
तर कधी तिच्या विरहाची असते....
कधी तिचं खळखळून हसणं
तर कधी तिचं गाल फुगवून बसणं असते...
कधी तिला प्रेमाने मनवणं
तर कधी जरा रागाने समजावणं असते.....
अशी हि कविता ....
कविता तिच्या जाण्याची
तिच्या लपवलेल्या आसवांची असते
कधी तिच्या सुटणा-या मिठीची
तर कधी तिला थांबवणा-या हातांची असते...........
अशी हि कविता............
----पाउसवेडा

Marathi Kavita : मराठी कविता