Author Topic: शोना तुला माझी बनवू तरी कसे.....  (Read 2281 times)

मनात आलेल्या भावनांना,
व्यक्त करु तरी कसे.....

भिडले ओठांना ओठ,
त्यांना आवरु तरी असे....

मिठीत तु असल्याचा भास होई,
मनाला माझ्या फसवू तरी कसे.....

जिव्हारी रुततोय हा दुरावा,
क्षणोक्षणी स्वतःला सावरु तरी कसे.....

तुटतोय तिळ तिळ जीव माझा,
ह्रदयाला समजावू तरी कसे.....

एक क्षणही करमत नाही आता,
फुलांना काट्यात फुलवू तरी कसे.....

मी तर तुझा झालोच गं सये,
शोना तुला माझी बनवू तरी कसे.....

शोना तुला माझी बनवू तरी कसे.....

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक २९-०८-२०१३...
दुपारी ०१,३९...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


विकास

  • Guest

तू थोर प्रेमवीर
मदनाचा अवतार
मी एक साधीसुधी नार
बनण्या तुझी मी पात्र कशी होणार?