Author Topic: मीच एकटा असेल..  (Read 2090 times)

Offline शापित राजकुमार

  • Newbie
  • *
  • Posts: 15
  • Gender: Male
  • शापित राजकुमार किंवा एक दीवना था
मीच एकटा असेल..
« on: August 31, 2013, 09:35:30 PM »
तुझ्या सौंदर्यावर
फिदा होणारे
लाखो असतील
पण त्याची तारीफ
करणारा मीच एकटा असेल..

तुझ्याशी बोलण्यासाठी
आतुरलेले सर्व असतील
पण ऐकणारा मीच
एकटा असेल..

तुला स्वताची बनवु
ईच्छणारे ही असतील,
पण तुझाच होणारा
मीच एकटा असेल..

तुझ्यासाठी जीव देईन
म्हणणारे भरपूर असतील
पण मला जगायचे आहे तुझ्यासोबत
म्हणणारा मीच एकटा असेल..

... सिध्दार्थ पाटील ™…
..दि. २५.०७.२०१३ ..

Marathi Kavita : मराठी कविता