Author Topic: नाती  (Read 1539 times)

Offline दिगंबर कोटकर

  • Newbie
  • *
  • Posts: 31
  • Gender: Male
  • Digamber A Kotkar
    • marathi.majhya kavita
नाती
« on: September 02, 2013, 07:13:31 PM »नाती सुकुमार फार, सहन करत नाही वार,
तोडण्यासाठी न लागे तलवार, जोडण्यासाठी कष्ट फार,
नाती सुकुमार फार..........


नाती हृदयाची नाळ, गोंडस बालकाची निरागस हाळ,
नाती कधी खूप खोल, तर कधी उथळ फार,
नाती सुकुमार फार..........

वर-वर नाती दिसतात छान, पण तीच नाती कधी पेटवतात रान,
नाती पावित्राचे गाव, नाती मांगल्याचे नाव,
नाती सुकुमार फार..........
     


दिगंबर

Marathi Kavita : मराठी कविता