Author Topic: प्रेम भेटता  (Read 1503 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
प्रेम भेटता
« on: September 05, 2013, 09:43:23 PM »
जर तुला कधी कुठे
प्रेम असेच भेटले
अंगणात हिमशुभ्र
छान चांदणे पडले

आनंदाने नृत्य कर
दोन्ही हात उंचावून
प्रेमाचे संगीत अन
वाहू देत रक्तातून

खरे वा खोटे असेल
थोडीशी भीती वाटेल
पाण्यात पडल्याविना
कोण तरणे शिकेल ?

डोळ्यात त्याच्या पाहता   
तुला सार ते कळेल
आणि तुझ्या मनामध्ये
एक कमळ फुलेल

ते कमळ उगाचच
सुकून देवू नकोस 
हाक येता कानावर
हिशोब करू नकोस 

विक्रांत  प्रभाकर
« Last Edit: April 19, 2014, 12:55:47 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता