Author Topic: स्पर्श तुझ्या गंधाचा  (Read 1979 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
स्पर्श तुझ्या गंधाचा
« on: September 07, 2013, 02:56:49 PM »
स्पर्श तुझ्या गंधाचा ……………… संजय निकुंभ
=============
स्पर्श होता तुझ्या गंधाचा
मनी मोर नाचतो
रोम रोम बहरून
श्वासात तुला भेटतो

तू अशीच वहाते माझ्यात
माझ्याही नकळत
दूर असूनही तुझा
स्पर्श मी अनुभवतो

तुझे असे असणे
हृदयी फुलवी चांदणे
मोगरा माझ्या प्रेमाचा
मनी फुललेला असतो

हि प्रीत वेडी प्रिये
तुझ्यासाठीच जगतो
मजलाही ठाव नाही
मी माझा किती उरतो .
-------------------------
संजय एम निकुंभ , वसई
दि . ७ . ९ . १३ वेळ : ६ . ३० स .

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
Re: स्पर्श तुझ्या गंधाचा
« Reply #1 on: September 11, 2013, 09:40:34 AM »
akdaum sahi