Author Topic: एक मात्र नक्की  (Read 1639 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
एक मात्र नक्की
« on: September 12, 2013, 07:20:16 PM »
एक मात्र नक्की ……………………. संजय निकुंभ
============
एक मात्र नक्की
मी तुझ्याआधी मरणार आहे
या जगात नसतांनाही
तुझ्या रूपांत उरणार आहे

इतका गंध प्रेमाचा
तुझ्या श्वासात भरणार आहे
कि मेल्यावरही तुझ्या डोळ्यात
आनंदाश्रू तरळणार आहे

तुझ्या हृदयाच्या कप्प्यांना
आठवणीनी भरणार आहे
माझे अस्तित्व संपूनही
तुझ्या डोळ्यांत मी असणारं आहे

मी बघतं राहीन तुला
माझ्यात डुंबलेली असतांना
तुझ्यावरच्या कवितांना गोंजारत असतांना
आपल्या जगण्यातला क्षण अन क्षण
त्या शब्दांत तुला गवसणार आहे
हे बघून मी हि आनंदी होणार आहे .
----------------------------------------
संजय एम निकुंभ , वसई
दि. १२ . ९ . १३  वेळ : ७ . ०० स.     


Marathi Kavita : मराठी कविता


Sangram kumar

  • Guest
Re: एक मात्र नक्की
« Reply #1 on: September 15, 2013, 11:15:14 PM »
प्रेम हे असच असत....
करताना ते कळत नसत आणि
केल्यावर ते उमगत नसत...
उमगल तरी समजत... नसत पण
आपल वेड मन आपलच ऐकत नसत...
ती फक्त त्या दोन जीवांनाच माहित असते.
लोक म्हणतात काय असत प्रेमात..
पण मी म्हणतो करून बघा एकदा..
काय नसत प्रेमात...?
प्रेम हे सांगून होत नसत...
मित्रानो ते झाल्यावरच कळत असत..
दोन जीवांना जोडणारा तो एक नाजूक धागा असतो...
दोन हृदयांची स्पंदने एकमेकांना ऐकवणारा एक भाव असतो...
प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते...
दोन शब्दात ती कधीच समजत नसते ....
म्हणूनच प्रेम हे असच असत
पण ते खूप खूप सुंदर असते.. ::)@Sangram kumar ::)[/font][/font][/font][/font][/font][/font]

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
Re: एक मात्र नक्की
« Reply #2 on: September 16, 2013, 09:53:32 PM »
thanx sangram