Author Topic: ध्यास  (Read 1961 times)

Offline aap

  • Jr. Member
  • **
  • Posts: 94
ध्यास
« on: September 18, 2013, 03:30:28 PM »
ध्यास

तू माझा श्वास तू माझा ध्यास मन माझे वेडे पिसे
जॆसा जळाविण मासा जीव तॆसा होतसे

गुंतती भावना हृदयात
पाऊस धारा लोचनी दाटतात

नको होऊ दृष्टी पल्याड
रहा असा सानिध्यात

तू असता समीप विसरते आत्मभान
भाव भावना होती जणु पुलकित

नजरेसि मिळता नजर निजबंध सुटतात
येता मिठीत तुझीया वाटे स्वर्ग माझ्या दारात

वाटे स्वर्ग माझ्या दारात
                                     सौ . अनिता .फणसळकर     
     

Marathi Kavita : मराठी कविता


स्मिता

  • Guest
Re: ध्यास
« Reply #1 on: September 19, 2013, 08:47:33 AM »

होईल "शुभमंगल"’ अपुले
एकदोन होतिल मग मुले
होईल मग हळूहळू दार सत्सृष्टिचे खुले
नि "तू माझा श्वास-ध्यास" स्वप्न होते खुळे कळे

Offline sweetsunita66

  • Full Member
  • ***
  • Posts: 862
  • Gender: Female
  • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: ध्यास
« Reply #2 on: September 21, 2013, 01:15:00 PM »
छान कविता !! :) :) :)