Author Topic: तुझ्यावर खूप प्रेम माझे ...............  (Read 10626 times)

तुझ्यावर  खूप  प्रेम आहे माझे
तुला सांगायला मला जमत नाही .......

ओरडतो तुला  नेहमी कारण
तुझ्याशिवाय करमत नाही........

ओरडतो मी तुझ्याशी
अबोला हि धरतेस तू
माझ्यासोबत भांडण करून
मग अश्रूंनाही जवळ करतेस तू ....................

खरच मला असह्य गं  तुझा माझा असा दुरावा
पाहत जा कधी तू  माझे हि  डोळ्यांना
विरहात   भांडणार्या  ह्या माझ्या हृदयाच्या स्पंदनांना.......

वाटता  कधी  तरी  समजून घेशील
तू  माझ्या मनाला
पण  तुलाही  ते जमत नाही
अन मी पुन्हा एकटा पडतो .............

समजावतो मनालाच  माझ्या
नशीबच  आहे  माझे  ऐसे
जे स्वप्नांनाही पूर्णत्व मिळत नाही ..............
तुझे  डोळे  बोलतात
माझ्या डोळ्यांना ते जमत नाही
विचारांचे  ओझे  मनावर
कधीच मला एकटे सोडत नाही ..........

तुझ्यावर  खूप प्रेम  माझे
कसे गं  तुला कळत नाही .............
-
©प्रशांत डी शिंदे

Marathi Kavita : मराठी कविता


नीलिमा

  • Guest

तुझे ओरडणे (मग माझे रडणे)
"तुझ्यावर  खूप प्रेम  माझे"
ऐकून कंटाळले रडगाणे
"प्रेम खूप" तुझे दिवाणे


तुझे ओरडणे (मग माझे रडणे)
"तुझ्यावर  खूप प्रेम  माझे"
ऐकून कंटाळले रडगाणे
"प्रेम खूप" तुझे दिवाणे
dhanch  nilima