Author Topic: गुंतल्या रे वेड्या मना  (Read 4525 times)

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
गुंतल्या रे वेड्या मना
« on: September 27, 2013, 11:22:41 AM »
गुंतल्या रे वेड्या मना


बघ नयनी तू माझ्या,
तोच धुंद पावसाळा,
भिजून घे चिंब जरा,
देह असा तहानेला......

छेड पुन्हा एकदा तू,
नाजुकशा पाकळ्यांना,
बघ आठवून जरा,
शहारल्या त्या क्षणांना.....

सख्या नकोस  हरवू ,
गर्द धुक्यांत स्वतःला,
बघ पल्याड जरासा,
ऋतू भरात आलेला ……

न्हाहून घे चांदराती,
नको विझवू तारका,
संधीकाली येते पहा
आर्त स्वरातील हाका  ……

गुंतल्या रे वेड्या मना,
नको रोखू श्वास असा,
सोड अंधार मनीचा,
जरा लांब घे उसासा ……

मिलिंद कुंभारे
« Last Edit: October 22, 2013, 04:48:45 PM by मिलिंद कुंभारे »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Maddy_487

 • Jr. Member
 • **
 • Posts: 145
 • Gender: Male
Re: गुंतल्या रे वेड्या मना
« Reply #1 on: October 03, 2013, 12:30:35 AM »
mastch milindji..

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: गुंतल्या रे वेड्या मना
« Reply #2 on: October 03, 2013, 03:44:42 PM »
Maddy....

thanks..... :)

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: गुंतल्या रे वेड्या मना
« Reply #3 on: October 04, 2013, 04:51:30 PM »
Sagar Bade,
thanks..... :)

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: गुंतल्या रे वेड्या मना
« Reply #4 on: October 15, 2013, 02:30:11 PM »
घे न्हाहून  चांदराती,
नको विझवू तारका,
आर्त स्वर ऐक जरा,
संधीकाली मंतरलेल्या  …
         
छान अष्टाक्षरी !!या  जागी मला वाटते असं हवं होत का ??
                              आर्त स्वर ऐक जरा
                               संधीकाली मंतरलेल्या 
                                 च्या ऐवजी ---बेधुंद अश्या सांजेला .
     घे न्हाहून  चांदराती,
     नको विझवू तारका,
     आर्त स्वर ऐक जरा,
     बेधुंद अश्या सांजेला .

     
फक्त एक विचार आला म्हणून सांगितलं ,अन्यथा घेऊ नकोस ,तुझ्या कविता अप्रतिम असतात ! :) :)

     ruturaaj

 • Guest
Re: गुंतल्या रे वेड्या मना
« Reply #5 on: October 15, 2013, 04:25:28 PM »
I am not the authority in this form of poetry, but I think this is better option for this "asthaxaree".

सख्या नकोस  हरवू ,
गर्द धुक्यांत स्वतःला,
बघ पल्याड जरासा,
ऋतू भरात आलेला ……

न्हाहून घे चांदराती,
नको विझवू तारका,
संधीकाली येते पहा
आर्त स्वरातील हाका  ……

गुंतल्या रे वेड्या मना,
नको रोखू श्वास असा,
सोड अंधार मनीचा,
जरा लांब घे उसासा ……

If I am wrong, please forgive me.

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: गुंतल्या रे वेड्या मना
« Reply #6 on: October 17, 2013, 11:17:48 AM »
sweetsunita,

मार्गदर्शनाबद्दल आभारी आहे.… आपण सुचविल्याप्रमाणे थोडा बदल कवितेत केला आहे. …… आवडतो काय बघा …… :)

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: गुंतल्या रे वेड्या मना
« Reply #7 on: October 17, 2013, 11:20:05 AM »
Dear Ruturaaj,

You are most welcome for criticism & suggestions.

आपण सुचवलेला गर्द हाच शब्द तिथे अभिप्रेत होता पण त्यावेळी मला  नेमका तो सुचलाच नाही … त्याबद्दल धन्यवाद …

आपण सुचविल्याप्रमाणे थोडा बदल कवितेत केला आहे. …… आवडतो काय बघा …… :)
« Last Edit: October 17, 2013, 11:24:45 AM by मिलिंद कुंभारे »

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: गुंतल्या रे वेड्या मना
« Reply #8 on: October 17, 2013, 11:25:52 AM »

प्रकाश कदम,
धन्यवाद …  :)

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: गुंतल्या रे वेड्या मना
« Reply #9 on: October 17, 2013, 10:24:20 PM »
good!