Author Topic: पाऊस तिचा नि माझा ....  (Read 1576 times)

Offline Er shailesh shael

  • Jr. Member
  • **
  • Posts: 77
  • Gender: Male
पाऊस तिचा नि माझा ....
« on: September 28, 2013, 08:09:07 PM »
अचानक कधीतरी ध्यानी मनी नसताना कोरड्या मणि विरक्त पाउस झेलताना
आली सामोरी ती किंचितशी बावरलेली ओल्या सोहळ्यात कोणीही नसताना....
ध्यानी आली माझ्या नियतीची लबाडी का आज तिची माझी वाट एक होती
रिकामे मन उरलेला माझ्यातला मी नशिबाने डोक्यावर छत्री मात्र एक होती..
पाउस सावरायला मन आवरायला अवकाश अन विजेने अंतर थोड़े कमी केले
गुंतला जीव त्याच श्वासात खांद्यावर तिचा हात जुनेच क्षण पुन्हा अवतरले....
तुझी नजर अजूनही नाराज आहे पोर्णिमेच्या रात्री आभाळ रीते भासतय
मिटल्या पापण्यांना अश्रुंचं अन तुझ्या हाताचं खांद्याला ओझं वाटतय......
तुझ्या वाटेचा अजाणता प्रवासी मी तुही आज पावलगणिक अडखळते आहे
फितूर तुझे केस माझ्या गालावर रूळताना घेउन आधार माझा मलाच दूर सारते आहे......
न काही बोलता माझी नजर खुप बोलून गेली जड़ पावली तीही दूरवर सोबत आली
ती येते म्हणताच पावसाने जोर वाढवला चिंब भिजल्या क्षणी निरोप घ्यायची वेळ आली....
ओघळले थेंब पावसाचे अश्रु माझे लपवत क्षणिक ती पाठमोरी झाली
सरी झेलत रिकाम्या हातात माझी छत्री तिच्या हातात राहिली
मी उरलो एकटा पण छत्री माझी नशीबवान ठरली ....

Marathi Kavita : मराठी कविता


ravi bhise

  • Guest
Re: पाऊस तिचा नि माझा ....
« Reply #1 on: September 29, 2013, 07:05:24 PM »
तुला येते का ग आठवण माझी सांज वेळ झाल्यावर
उठ्तना मनात काहूर आभाळ भरून आल्यावर

उभा राहतो का भूतकाळ अन सोबतीचे काही क्षण
विचारांची सैर भैर अन ओलावते न मन 

शोधू पाहतेस का कधी आपली हरवलेली पायवाट
जागवते का ओढीने तुला तहानलेली ओली पहाट

खुळावतेस काग अजून तशीच टपोर चांदण पडल्यावर
मिटतात न आपसूकच डोळे तुटता तारा पाहिल्यावर

     तुला येते काग आठवण माझी ??????
                                                                      रवी भिसे 9881360334

ravi bhise

  • Guest
तुला येते काग आठवण माझी ??????
« Reply #2 on: September 29, 2013, 07:13:51 PM »

तुला येते काग आठवण माझी ??????

तुला येते का ग आठवण माझी सांज वेळ झाल्यावर
उठ्तना मनात काहूर आभाळ भरून आल्यावर

उभा राहतो का भूतकाळ अन सोबतीचे काही क्षण
विचारांची सैर भैर अन ओलावते न मन 

शोधू पाहतेस का कधी आपली हरवलेली पायवाट
जागवते का ओढीने तुला तहानलेली ओली पहाट

खुळावतेस काग अजून तशीच टपोर चांदण पडल्यावर
मिटतात न आपसूकच डोळे तुटता तारा पाहिल्यावर

     तुला येते काग आठवण माझी ??????
                                                                      रवी भिसे 9881360334