Author Topic: मोडू म्हणूनिया कधी  (Read 1302 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
मोडू म्हणूनिया कधी
« on: October 01, 2013, 06:17:29 PM »
मोडू म्हणूनिया कधी
नाते नच मोडते रे
सोडू म्हणुनिया कधी
प्रेम नच तुटते रे

सुख दु:खी बांधलेल्या
गाठी जन्मा सवे येती
नाही म्हणूनि का कधी
अव्हेरती बीजा माती

लक्ष लक्ष योजने ती
पक्षी दिगंतरा जाती
साद घालताच कुणी
पुन्हा परतुनी येती
 
विक्रांत प्रभाकर
« Last Edit: April 19, 2014, 12:49:21 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता