Author Topic: माझ्या अस्तित्वाच्या खुणा  (Read 872 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
माझ्या अस्तित्वाच्या खुणा
====================
एक एक करत
माझ्या अस्तित्वाच्या खुणा
पुसून टाकल्यास तू तुझ्या हातानं

आता माझं सगळं जगणं
तुझ्या अस्तित्वाने भरलंय
इतकं झपाटलंय तू तुझ्या प्रेमानं

कळत काहीच नाही
इतका कसा मरत गेलो
कि विसरलोय स्वतःला तुझ्यात गुंतल्यानं

तुला घेतलंच कसं
मला काहीही न विचारता
माझ्या मनाच्या घरांत माझ्याचं काळजानं .
=========================
संजय एम निकुंभ , वसई
दि. २ .१० .१३ वेळ : १२ . ४० दु.