Author Topic: तुझ्यासारखी मुलगी कधी बघितलीच नाही…  (Read 1973 times)

Offline सतीश भूमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 152
  • Gender: Male
  • माझ्या उनाड कविता..
खरंच तुझ्यासारखी मुलगी मी आज पर्यंत कधी बघितलीच नाही…
दिसण्याच्या बाबतीत एखाद्या अप्सारेलाही लाजवणारी पण
कधी कधी एखाद्या वेडयासारखा अवतार धारण करणारी तुझासारखी
वेडूबाई मी आज पर्यंत कधी बघितलीच नाही… 

'तू मला आत्ताच्या आत्ता इथे पाहिजेस…!! अस म्हणून माझी
धांदल उडवणारी व भेटल्यानंतर 'सॉरी खूप दमलास न रे माझामुळे...??
अस म्हणून माझी काळजी घेणारी विचित्र हट्टी मुलगी मी आज
पर्यंत कधी बघितलीच नाही…

माझी प्रत्येक चुकी माफ करणारी परंतु 'मित्रांसोबत सिगरेट का पिलास..??'
असा जाब विचारून कानाखाली आवाज काढणारी तुझासारखी
महाकाली मी आज पर्यंत कधी बघितलीच नाही… 

लग्नाचा विषय काढल्यावर गोड लाजणारी पण पळून लग्न
म्हंटल कि आगेसारखी भडकणारी तुझासारखी भयानक
मुलगी मी आज पर्यंत कधी बघितलीच नाही… 

हॉटेलमध्ये मला फ़ुल्ल टाकणारी परंतु महिना अखेरीस
'पैसे संपले ना रे तुझे..?? असं विचारून हळूच पर्समधून दोनशे
काढून देणारी तुझासारखी एंटीक मुलगी मी आज
पर्यंत कधी बघितलीच नाही… 

सतत हसणारी व दुसऱ्यांना हसवणारी परंतु दुःख अनावर
झाल्यावर माझाच खांद्यावर डोकं ठेऊन मला घट्ट पकडून
मनसोक्त रडणारी तुझासारखी रडूबाई मी आज पर्यंत खरच
ग खरंच कधी बघितलीच नाही.... 

@सतीश भूमकर.
« Last Edit: October 03, 2013, 12:47:50 AM by सतीश भूमकर »