Author Topic: तुझ्या शिवाय आता नकोसे वाटते मला माझे मीपण  (Read 3389 times)

Offline kavita.sudar15

  • Newbie
  • *
  • Posts: 28
प्रत्येक क्षण तुझ्यासवे जगावेसे वाटते,
  तुझ्याच स्वप्नात रमून जावेसे वाटते...!
तू नसलीस कि नजर माझी कासावीस होऊन जाते,
  तुझीच एक झलक पाहण्यास नजर माझी भिरभिर फिरते....!
मन वेडावून जाते तुझ्या कोमल स्पर्शाने,
   तुझ्याच भेटीचा मग गंध दरवळतो दाही दिशाने....!
आतुर हे मन माझे तुझ्या सहवासास,
    कधी दरवळेल आपल्या प्रेमाचा सुवास....!
समुद्र किनारी लाटांचा स्पर्श व्हावा पायांस,
   तशी तुझी स्वप्ने मज पाहण्याचा हव्यास....!
तूच माझे मन अन तूच आता जीवन,
  तुझ्या शिवाय आता नकोसे वाटते मला माझे मीपण.....!!!!!
   तुझ्या शिवाय आता नकोसे वाटते मला माझे मीपण.....!!!!! @ कviता @

Marathi Kavita : मराठी कविता


suraj khirale

  • Guest
Khup sunder ashi kavita ahe

Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
छान आहे कविता .... :)