Author Topic: गुन्हा तरी काय केला…??  (Read 1670 times)

Offline सतीश भूमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 152
  • Gender: Male
  • माझ्या उनाड कविता..
गुन्हा तरी काय केला…??
« on: October 09, 2013, 10:14:56 PM »
एक कन्या होती अतिसुंदर
शृंगाराच तिला भलतं वेड
येता-जाता आरशात पाही
स्वतःलाच पाहून हसत राही

तिच्यायाच हसण्याने कहर झाला
तो आरसाही तिच्या रुपाला भुलु लागला
नकळतच तिच्या प्रेमात पडू लागला
अन तिच्या हसण्याला बघत जगू लागला

पण एके दिवशी न जाने
तिचा काय तोल गेला
अन हातातला आरसा तीने
भिंतीवर भिरकावून दिला

कळलंच नाही त्या आरशाने
गुन्हा तरी काय केला…??
प्रेम केलं जिच्यावर तिच्याच हातून
मरण्याचा योग नशिबी त्याच्या का आला…??

@सतीश भूमकर

Marathi Kavita : मराठी कविता