Author Topic: प्रतीक्षा ………… संजय निकुंभ  (Read 1001 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
प्रतीक्षा ………… संजय निकुंभ
============
एका पाठोपाठ एक
तुला पाठवत रहातो कविता
तू प्रतिसाद देणार नाहीस
हे माहित असून सुद्धा

पण तू नक्की त्या कविता
मनापासून वाचत असशील
त्या प्रत्येक शब्दाशब्दात
तुला पाहून हसत असशील

किती प्रेम करतो तुझ्यावर
तुला ठाऊक आहेच
तू हि त्या कवितेत
हरवून जात असशील

तुझी कविता नाही आली
तुझी साद येईल एक दिवस
त्या क्षणाची मज प्रतीक्षा
तो क्षणही नक्कीच भेटीस येईल .
=====================
संजय एम निकुंभ , वसई
दि. ८ . १० . १३ वेळ : ५ . ३० स.