Author Topic: नैसर्गिक आपत्तीसम… प्रेम  (Read 880 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
खोल गहिऱ्या महासागरासम 
शांत निष्क्रिय जरी मी असलो …
मनातल्या प्रेमाच्या लाटा मात्र
तिच्या मनापर्यंत थडकत असतात.


नैसर्गिक आपत्तीसम…
जणू प्रेमसदृश्य मनाच्या क्रिया,
जश्या कोणीही रोखू शकत नाही …
त्या प्रेम विरोधींना हतबल करूनच सोडतात. - हर्षद कुंभार (Harshad Kumbhar).