Author Topic: स्वप्न...प्रत्येक प्रेम करणाऱ्याच  (Read 1572 times)

Offline सतीश भूमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 152
  • Gender: Male
  • माझ्या उनाड कविता..
दूर कुठेतरी आपलं एक
छोटंसं घरकुल असाव
त्यात तुझ्यामाझ्याविना
दुसरं कुणीच नसावं

माझ्या डोळ्यांनी तुझ्या
डोळ्यांशी दिवसभर खेळावं
अन रात्री तुझं ते मखमली
तारुण्य पांघरून मी झोपावं

अगदी तुझ्यासारखच गोंडस
आपलं पण एक पिल्लू असावं
मला पप्पा आणी तुला मम्मी
म्हणत त्याने घरभर बागडावं

असं घडलं तर किती सुंदर होईल
आणी जिवंतपणे मज स्वर्ग प्राप्त होईल

@सतीश भूमकर
« Last Edit: October 15, 2013, 09:39:52 PM by सतीश भूमकर »