Author Topic: माझ्या मनाला समजावून पाहिलं.........  (Read 1649 times)

माझ्या मनाला  समजावून  पाहिलं
कधी कधी  थोडं हसून ही पाहिलं ...........

दुख  खूप आहेत मनाला
त्यापासून   थोडं दूर  जाऊन पाहिलं ...............

जमलंच नाही विचारांच्या जाळ्यातून मुक्त फिरायला
मला नको हवे होतं ते
मी आज  तुझ्या  डोळ्यांत ही आसवे पाहिलं ................

मी चुकलो सये
माझ्या मनाची  स्थिती खूपच  विचित्र
नसतं तुझ्यावर चिडायचं मला
तरी ही तुझे मन  दुखावतो
तुला माझ्यासाठी रडताना पाहून
मी मलाच खूपच  दोषी  धरलं...............

समजून घेशील का  सये माझ्या  वेड्या प्रेमाला
तुझ्या आधारासाठी  मी  रोजच
त्या  दगडासमोरही  फुल  वाहिलं
कधी नव्हे ते माथा  टेकवून
त्याच्या चरणांत अश्रू  मी वाहिलं..............

किती  वेडे हे मन
किती वेडी ही माया
राग ओसरून  गेल्यावर तुला मी  माझ्या मिठीत  पाहिलं ................
-
©प्रशांत डी शिंदे
दि.१८-१०-२०१३