Author Topic: माझे न राहिले गं  (Read 2343 times)

Offline shailesh.k

 • Newbie
 • *
 • Posts: 8
 • Gender: Male
माझे न राहिले गं
« on: October 19, 2013, 04:30:13 PM »
मम भाव अंतरीचे
माझे न राहिले गं
हरवून मात्र गेले
तव प्रीतीच्या कुशीत…

रातराणी ती माझ्या दारी 
माझी न राहिली गं
दरवळून हळूच गेली
तव सुगंधी झुळूक…

त्राण माझीया देहाचे
माझे न राहिले गं
अर्पुन सर्व गेले
तव प्रेमळ मिठीत…
 
अंगणी कळी गुलाबी
माझी न राहिली गं
गुंफून रंग गेली
तव केसांच्या बटांत… 

माझ्या या गं ओळी
माझ्या न राहिल्या गं
सुचवून शब्द गेल्या
तव वर्णनाचे गीत…

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: माझे न राहिले गं
« Reply #1 on: October 20, 2013, 12:42:02 AM »
chhan

Offline सतीश भूमकर

 • Jr. Member
 • **
 • Posts: 152
 • Gender: Male
 • माझ्या उनाड कविता..
Re: माझे न राहिले गं
« Reply #2 on: October 20, 2013, 10:39:48 PM »
sundar...

Offline shailesh.k

 • Newbie
 • *
 • Posts: 8
 • Gender: Male
Re: माझे न राहिले गं
« Reply #3 on: October 21, 2013, 01:23:37 PM »
 :) thank you...

Jawahar Doshi

 • Guest
Re: माझे न राहिले गं
« Reply #4 on: October 28, 2013, 06:50:50 PM »
Kavita phar sundar aahe. Hi kavita kunachi Aahe?