Author Topic: मन......................  (Read 1609 times)

मन......................
« on: October 21, 2013, 12:10:24 PM »
वाऱ्यामध्ये  वाहून  जावं
बेभान लहरीसारखे  मोकाट फिरावं
किती  वेदना  ह्या  विचारांचे
वाटत थोडं  मिठीत तुझ्या हलके व्हावं...............

समजून घेतेस मला
माझ्या डोळ्यांतल्या  त्या अश्रुधारांना
मग तुझासोबत वाटतं आयुष्याने असेच सुगंध बहरावं .............

मन आहे  हे कधी  हसायला लावतं
तर कधी एकटेच राहायला शिकवतं
किती आवर घालायचे ह्याला
प्रेमानेच  सारखे समजवायचं ...................

वेड्या मना  सोड आता ते  विचार
तुलाच  तुझे आयुष्य घडवायचे आहे ..................
-
©प्रशांत डी शिंदे
दि.२१ -१०-२०१३


Marathi Kavita : मराठी कविता