Author Topic: फक्त तुलाच...  (Read 1311 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,268
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
फक्त तुलाच...
« on: October 23, 2013, 12:40:31 PM »
तूझ्यासाठी कविता लिहू म्हटल !
कागदावर शब्दच उमटेना,
रक्त ल्यालो भाळी तूझ्या,
तेंव्हाच सार सुरु झालं !

काय लिहू तूझ्या साठी ?
हे सार, तर तुझच आहे,
धमनीतल्या प्रत्येक थेंबाला,
तुझीच प्रेरणा आहे !

मला कळत नाही...
कशासाठी हे सार ?
वेगळी वाट तूझी – माझी,
त्याच चाकोरीतली... तांबडी,
भेट होईल पुन्हा, वळणावर...
कधी तरी, तेव्हां  मात्र...
सागू नकोस लिहायला कविता,
मी शहारतो, हात थरारतो,

हां, मनातून गोड हसत जा,
निदान काही काळ,
तांबडी वाट दिसेल मला !
चालतो तर आहेच मी...
फक्त तू हसत रहा...


© शिवाजी सांगळे sangle.su@gmail.com  +91 9422779941

Marathi Kavita : मराठी कविता